पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य टोल वसुली जोमात नागरिक कोमात
पुणे / पुणे वैभव न्युज
पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे साक्षात यम देवाचे दर्शन घेऊन पुढे जाणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेली अनेक वर्षापासून सतत वादाच्या भोवऱ्यात असणारा शिवापूर टोल नाका येथे गाड्यांच्या टोल वसुलीत करोडो रुपयांची माया गोळा करणारे मध्यम झाले आहे.
नागरिकांना पुण्यापासून ते भोर तालुक्यातील सारोळे येथील निरा नदीपर्यंत पोहचे पर्यंत हा महामार्ग आहे की 1857 च्या काळातील एखाद्या खेडेगावातील रस्ता आहे हे कळेना झाले आहे.
पुणे सातारा महामार्गावर कुठल्या प्रकारचे सोयी सुविधा नसून टोल वसुली जोमात सुरू आहे.
तरी या रस्त्याने प्रवास करणे जिकीरीचे झाले असून.या रस्त्यावर अपघातात अनेक नागरिक मृत्यू होऊन अनेक घरे उद्वस्थ झाली आहेत.
तरी टोल नाका चालवणारे या गंभीर बाबी कडे गंभीर होऊन कधी रस्ते सुरळीत करणार अशी अर्त हाक वाहन चालक व मालक देत आहेत.
जर लवकरात लवकर या रस्त्यावर पडलेले खड्डे सुरळीत केले नाही तर काही संघटना रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची चर्चा सध्या जर धरू लागली आहे.


