सामाजिक

किकवी येथे भेसळ युक्त अवैद्य ताडी विक्री जोमात


 

किकवी येथे भेसळ युक्त अवैद्य ताडी विक्री जोमात

भोर तालुक्यातील नागरिकांच्या हितासाठी (भाग 1)

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या किकवी येथे किकवी औट पोस्ट पोलीस चौकी च्या हाकेच्या अंतरावर नागझरी वागजवाडी रोड च्या कडेला अवैध्य बिना परवाना भेसळ युक्त ताडी विक्री जोमात सुरु आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दर वर्षी किकवी येथील ताडी विक्री दुकानाला जवळजवळ 10 लाख रुपयाचे लायसन्स शुल्क आकारले जाते . पण शासनाचा महसूल बुडवत गेली अनेक महिन्यापासून
राज्य उत्पादन शुल्क सासवड चे पोलीस निरीक्षक बर्गे व पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्या आशीर्वादाने किकवी येथे भेसळ युक्त अवैध्य ताडी विक्री जोमात सुरु आहे अशी चर्चा किकवी परिसरात सध्या जोरदार चालू आहे.

भेसळ युक्त ताडी पिऊन काही तरुण आपल्या प्राणाला मुकले असून अनेक तरुण बरबाद झाले आहेत तर अनेक संसार उद्वस्त झाले आहेत.

नागझरी वागजवाडी रस्त्याला किकवी व वागजवाडी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे.
या रस्त्यावर भेसळ युक्त ताडी पिऊन ताडीच्या नशेने अनेक नागरिक या रस्त्यावर पडलेले असतात.
या नागरिकांना पाहून स्वतःच्या शेता मध्ये जाण्या येण्यासाठी महिला घाबरत असून ही अवैद्य भेसळ युक्त ताडी दुकान बंद करण्यासाठी किकवी वागजवाडी गावामधील नागरिक मागणी करत आहेत.

जर कोणी या अवैद्य ताडी विक्री करणाऱ्या च्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली तर त्या नागरिकाला गुंड प्रवृत्तीने दम बाजी केली जाते म्हणून शेतकरी कुटुंबातील नागरिक या नशेड्या ताडी वाल्यांच्या जाचाला कंटाळले आहेत.

तरी भोर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी. तहसीलदार . व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारि यांनी या गावातील नागरिकांना सुखाने जीवन जगण्यासाठी हे अवैद्य ताडी दुकान बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.