भोर तालुक्यात एक तथा कथित डॉकटर स्त्री अर्भकाची करतोय हत्या .
- भोर तालुक्यात एक तथा कथित डॉकटर स्त्री अर्भकाची करतोय हत्या .
पुणे वैभव : पुणे
पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या भोर तालुक्यात एक तथा कथित डॉकटर ओम साई राम म्हणत स्त्री अर्भकाची हत्या करत असल्याची चर्चा भोर तालुक्यात जोर जोरात चालू आहे.
जर एखाद्या जोडप्याला दोन किंवा तीन मुली असतील तर मुलगा होण्यासाठी अवशद देऊन हमकास मुलगा होईल अशी थापा मारून एक तथा कथित डॉकटर स्त्री अर्भकाची हत्या करून लाखो रुपयांची माया गोळा करत पैसे कमावण्याचा व्यवसाय या डॉकटर चा जोरात चालू आहे.
एकदम शांत वातावरणात मोबाईल वर्ती सोनोग्राफी करून मुलगा आहे की मुलगी ते पाहायचे जर मुलगी असली तर त्या महिलेला लगेच पोटातील स्त्री अर्भक मारण्यासाठी गोळ्या देऊन पुन्हा मुलगा होण्यासाठी अवशद गोळ्या सुरु करून.
निष्पाप जीवाची एका प्रकारे हत्याच करत असलेला डॉकटर लाखो रुपये कमवत आहे. अशी जोरदार चर्चा सध्या भोर तालुक्यात सुरु आहे जर एखादा नागरिक चुकून या बाबत माहिती देऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्या नागरिकाला दम बाजी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून नागरिक अशी माहिती शासकीय् विभागाला देण्यासाठी घाबरत आहे.स्त्री अर्भकाची हत्या करणारी ही मोठी टोळी असून . या टोळीच्या मुस्क्या आवळण्यासाठी व
भोर तालुक्यातील या तथा कथित डॉकटर वर्ती कडक कार्यवाही करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना एक संघटना निवेदन देणार असल्याचीही चर्चा सध्या भोर तालुक्यात चालू झाली आहे.


