लहू नाना शेलार यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग
लहू नाना शेलार यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग
पुणे वैभव : न्युज नेटवर्क
नसरापूर / भोर
भोर तालुक्यातील चेलाडी ते राजगड तालुक्यातील रस्त्याला गेली अनेक वर्षापासून मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात होऊन अपघातात अनेक नागरिक मरण पावले असून हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.
भोर व राजगड तालुक्यातील अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली झाडावर बसून शोले स्टाईल आंदोलने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा मधे झाडे लावणे अश्या एक नाही तर अनेक प्रकारचे आंदोलने झाली तरी पण .
राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जरा सुद्धा कीव आली नाही.
पण भारतीय जनता पक्षाचे. सर्व सामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन नागरिकांच्या अडी अडचणीच्या वेळी जनतेची सेवा करत असलेले तळमळीचे नेते .
लहू नाना शेलार यांनी राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना .
19 ऑक्टोंबर रोजी तीव्र पद्धतीचे आंदोलन करणार असल्याचे पत्र देताच राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली व आज 17 ऑक्टोंबर रोजी चेलाडी ते राजगड तालुक्यातील रस्त्यानं मध्ये पडलेले खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.
दीपावली सनाच्या अगोदर खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांना थोडी उसंत मिळाली आहे


