कारी उत्रोली गटात प्रस्थापितांच्या विरोधात शेतकरी पुत्र सचिन नवघने मैदानात
कारी उत्रोली गटात प्रस्थापितांच्या विरोधात शेतकरी पुत्र सचिन नवघने मैदानात
पुणे वैभव न्यूज नेटवर्क : भोर
भोर तालुक्यात गेली अनेक दशकांपासून तेच तेच चेहरे निवडणूक लढणार .आणि त्याच ठराविक लोकांनी लोकशाहीचा गळा आवळून सत्ता गाजवण्याची कामे करायची.
निवडणूक प्रचारात पायाला फोड येई पर्यंत नागरिकांच्या घरा घरात जाऊन ठरलेले प्लॅन बी चा वापर करून खोट्या फसव्या आश्वासनांना मतदारांना बळी पडून भुल थापा मारून मतदान घ्यायचे व निवडून आले की परत पाच वर्ष मतदार संघात काय . पण गाड्यांच्या काचा पण खाली घेत नसणारे प्रस्थापित यांच्या विरोधात टीटेघर चा एक सुसंस्कृत तरुण सचिन नवघने हे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये कारी उत्रोली जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे.
निवडणूक का लढविणार पाहू
सचिन गुलाबराव नवघणे
मु.पो. टिटेघर, या.भोर , जि.पुणे.
पदवी – M.com
पेशा- नोकरी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ता
रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावातुन आमची आयुष्याची वाटचाल चालू झाली.
तीन पिढ्यांपासून मुंबई ते गावापर्यंत आमच्या भागातील सर्व सामान्य लोकांनी कष्टाची हमालीची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवला.
माथाडी कामगार युनियन स्थापनेसाठी पुढाकार घेतलेले आमच्या भागातील सर्वच माजी माथाडी कामगार ते आज तिसऱ्या पिढीतील सुशिक्षित तरुण असा आमच्या कारी उत्रौली गणातील भुमिपुत्रांचा इतिहास.
हाच इतिहास डोळ्यासमोर ठेवून रायरेश्वर साक्षी शपथ घेतली की, आपल्या भागात आर्थिक काहीच करता नाही आल तरी चालेल पण सर्व सामान्यांन वर होत असलेल्या अन्याय विरूद्ध आवाज उठवायचा,
नेहमी सत्याच्या पाठीमागे भक्कम उभ राहायचं.
कितीही विरोध झाला,
त्रास झाला, दबाव आणला गेला तरी कायद्याच्या जोरावर दोन हात करत न्याय हा मिळवायचाच ही जिद्द मनात धरून तालुकाभर काम करण्यास सुरुवात केली.
हे करत असताना सर्व प्रथम जाणवलं ते भागातील लोकांना उध्दवस्त करत असलेले दारु धंदे, ताडी विक्री केंद्रे, मटका जुगारचे अड्डे, अणि सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी लोकांना भक्कम आधार असलेली त्यांची जमिन यापासून त्यांना भुमिहीन करण्यासाठी चालु असलेले गैर प्रकार या महत्त्वाच्या गोष्टींना विचारांत घेऊन त्यावरच सर्व प्रथम काम केल.
अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, गाव बैठक घेऊन भागातील लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न केला. त्यात यश नक्कीच आले पण अजुनही थोड काम बाकीच आहे.
सामाजिक काम करत असताना,
मैदानी खेळांविषयक, सांप्रदायिक क्षेत्रातली वारकरी सेवा तसेच
सरकारी काम असतील, त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, पशुवैद्यकीय विभाग, वन विभाग, पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD, पाणीपुरवठा विभाग, रेशनिंगचा पुरवठा विभाग, घरकुल विषयक,ST महामंडळ, महावितरण विभाग, पाटबंधारे खात,PDC बँक,पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, भुमि अभिलेख कार्यालय,
सर्कल,तलाठी ते अगदी गावांतील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक इथं पर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चुकीच्या कामांविरोधात कायदेशीर पत्र व्यवहार करून त्यांना पुर्णपणे थांबविण्यासाठी आजही सगळे मिळून काम करत आहोत आणि करत राहु.
जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणूक 2025 मधील कारी उत्रौली जिल्हा गणातील स्थानिक भुमिपुत्र म्हणून निवडूक लढविण्यासाठी इच्छूक आहे.
सामाजिक काम करत असताना तुम्ही सत्तेत असाल तर अधिक प्रभावी काम करू शकता.
निव्वळ स्वताला मोठ करण्यासाठी राजकीय क्षेत्राचा आधार घेतला जात असल तर ते चुकीचे आहे अस मला वाटत.
गणातील विकास काम नक्कीच उल्लेखनीय आहेत पण चुकीच्या कामा विरोधात कोणतीच सतर्क नाहीत.
भागातील कामांचा आढावा घेतला तर काही सर्व सामान्य आजही शासनाच्या निधीपासुन वंचितच आहेत.
वैयक्तिक लाभार्थी पासुन ते अनेक शासकीय योजना ह्या पुढाऱ्यांच्या घशात घातल्या जातात.
विकास कामे पुढारी म्हणतील त्याप्रमाणेच केली जातात.
निधी शासनाच्या पण त्याचे मालक पुढारी वर्ग हे समीकरण आजही बदलेले नाही.
शासनाच्या तिजोरीत असणारा निधी सर्व सामान्यांच्या हक्काचा असतो.
ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता किंवा जहागिरदारी नसते.
म्हणूनचं आपला न्याय आपणच करायचा.
याद्वारे गणातील सर्व इच्छुक सुशिक्षित तरुण मतदारांना आव्हान करतो की, मी निवडूक ही स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर सर्व सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी उमेदवार म्हणून निवडणुकी लढवत आहे.
तरी मला निवडणुकीत भरघोस मतदान करण्याची विनंती करत आहे.
आणि आपण स्वतः ही निवडणूक लढावत आहात असे समजावे. व
सर्व सामान्यांनवर होत असलेल्या अन्याय विरूद्ध ठाम उभ राहण्याची मला संधी द्यावी अशी तळमळीने विनंती करत आहे.


