सामाजिक

महामार्ग पोलीस यांच्या वतीने खेड शिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न


 

महामार्ग पोलीस यांच्या वतीने खेड शिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर
आज दि. 09/01/2026 रोजी  रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे अनुषंगाने पो.उप निरीक्षक. विजय गुरव, पो.उप निरीक्षक साखरे व स्टाफ म.पो. केंद्र सारोळा असे मिळून म.पो.केंद्र सारोळा कार्यक्षेत्रातील एन एच 48 वरील खेड शिवापूर टोल नाका येथे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी चालकांना रस्ता सुरुक्षा विषयी माहिती देण्यात आले.व नियमांचे  पालन करण्याबाबत प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.
1) दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा तसेच चारचाकी वाहन चालवताना नेहमी सिट बेल्टचा वापर करावा.
2) वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये.
3) चालक परवाना व कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
4) दारू पिवून अगर अंमली पदार्थाचे अंमलाखाली वाहन चालवू नये.
5) वाहन चालविताना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे.
6) ट्रिपल सीट वाहन न  चालविणे
7) गावांमधील रस्त्याने महामार्गावर येते जाते वेळेस व महामार्ग ओलांडत असताना वाहतूक बघून सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे.
8) महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना  मदत करावी
9) 1033 108 112 या हेल्पलाइन  नंबरची माहिती दिली .
राष्ट्रीय महामार्ग अधिकारी/कर्मचारी व महामार्ग पोलीस केंद्र सारोळा यांचे वतीने ज्या वाहन चालकांनी हेल्मेट परिधान केले त्यांना गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले.