रोड अपघातातील अपघात ग्रस्त नागरिकाचा डो मंदार माळी यांनी वाचवला प्राण
रोड अपघातातील अपघात ग्रस्त नागरिकाचा डो मंदार माळी यांनी वाचवला प्राण
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क वर्वे / भोर
पुणे सातारा महामार्गांवर मंगळवारी दिनांक 14 रोजी वर्वे येथील रेड्डी होटल समोर एका अज्ञात वाहन चालकाने अपघात करून अपघातामधील नागरिकाला रेड्डी हॉटेल समोर फेकून दिल्या चा प्रकार घडला होता.
१०८ एम्बुलेंस गाडीला कॉल पडल्यामुळे तो कॉल किकवी येथील १०८ एम्बुलेंस यांना भेटला तेव्हा तत्पर इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी व पायलट कदम हे तत्पर त्या ठिकाणी गेले तेव्हा त्या ठिकाणी त्या रुग्णासोबत कोणी नव्हते त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासद त्या अपघात स्थळी डॉ मंदार माळी यांनी अपघातग्रस्त नागरिकाची तात्काळ तपासणी केली.
अपघातातील नागरिकाच्या उजव्या बाजूचा हात पाय मणका मोडलेला दिसून आला त्या वेळी डॉ मंदार माळी यांनी त्यांना खेडशिवापूर येथे नेले व तेथून मेडिकल ऑफिसर यांच्या सल्ल्याने ससून येथे पुढील उपचारासाठी सुखरूप पोच केले व सदर रुग्णाला ह्या दरम्यान जी अत्यावश्यक सेवा भेटली त्या साठी वर्वे परिसरातील नागरिकांनी १०८ अत्यावश्यक सेवा तसेच डॉ मंदार माळी पायलट विशाल कदम डिस्ट्रिक्ट मैनेजर डॉ प्रियांका जावळे तसेच एडीएम सुजित कदम यांचे आभार म्हणून कौतुक केले.


