प्रस्थापित पिता पुत्राच्या विरोधात 7 नोव्हेंबर रोजी भोर तहसील कार्यालय आवारामध्ये उपोषण कर्ते करणार आत्मदहन.
प्रस्थापित पिता पुत्राच्या विरोधात 7 नोव्हेंबर रोजी भोर तहसील कार्यालय आवारामध्ये उपोषण कर्ते करणार आत्मदहन.
पुणे वैभव : न्युज नेटवर्क
भोर : भोर तालुक्यातील विलास बांदल. गोविंद तनपुरे . व किशोर बारणे हे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भोर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष जाऊन आत्मदन करणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे . व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी शासनाच्या जागा त्यांच्या संस्थांसाठी व वैयक्तिक फायद्यासाठी .
बेकायदेशीर व अनधिकृतपणे शासकीय अधिकारी व शासन यांना हताशी धरून जवळजवळ 500 कोटी रुपयांच्या गैव्यवहारप्रकरणी.
15 ऑगस्ट 2025 पासून आज पर्यंत भोर तहसील कार्यालय आवारामध्ये बांदल . तनपुरे . व बारणे यांनी उपोषण सुरू केले आहे.पण
शासन आणि प्रशासन यंत्रणेने उपोषणाची दखल न घेतल्यामुळे हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे उपोषण कर्ते यांनी सांगितले.
विलास अमृतराव बांदल (रा. संगमनेर), गोविंद कोंडीबा तनपुरे (रा. थांगवडी) आणि किशोर लक्ष्मण बारणे (रा. निगडे धांगवडी) या तिघांनी मिळून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा केला आहे
.त्यांच्या म्हणण्यानुसार, भोर तालुक्यातील विविध गावांतील शासनाच्या आणि सार्वजनिक मालकीच्या जमिनी श्री. अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांनी त्यांच्या संस्थांच्या नावावर बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याचे आरोप आहेत.
भाटघर धरण परिसर, संगमनेर येथील कौल कारखाना, नेकलेस पॉईंट, तसेच भोर शहरातील काही वसतीगृहांच्या जागांसह अनेक ठिकाणांचा यात समावेश असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.याप्रकरणी संबंधित महसूल व इतर विभागांनी कोणतीही चौकशी केली नाही, उलट सर्व अधिकारी थोपटे पितापुत्रांना संरक्षण देत असल्याचा आरोप उपोषण कर्ते यांनी केला आहे.
त्यामुळे शासनाची अंदाजे ५०० कोटी रुपयांची मालमत्ता गमावल्याचा दावाही करण्यात आला आहे
.उपोषण कर्ते बांदल.तनपुरे. व बारणे यांनी जनतेस आवाहन केले आहे की, त्यांच्या आत्मदहनानंतरही संबंधित जमीन प्रकरणांवर जनहितासाठी आंदोलन सुरू ठेवावे. प्रशासन जर आमच्या मरणाची वाट पाहत असेल तर सत्याच्या शोधात आम्ही मेलो तरी मागे हटणार नाही.


