सामाजिक

डॉ मंदार माळी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त किकवी पंचक्रोशीतील होतकरू महिलांना केले सन्मानित


 

डॉ मंदार माळी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त किकवी पंचक्रोशीतील होतकरू महिलांना केले सन्मानित

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

किकवी येथे भारतीय जनता पक्षाचे भोर तालुका डॉकटर सेल चे अध्यक्ष 108 गाडीवरील एमरजेन्सी मेडिकल ऑफिसर साई स्पर्श हॉस्पिटल चे मालक डॉ. मंदार माळी यांच्या संकल्पनेतून
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून किकवी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, स्वयंसहाय्यता बचत गट, तसेच उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करताना सांगितले की, आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे येऊन समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही यावेळी डॉ मंदार माळी यांनी केले .
या कार्यक्रमाला राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी विजया महेश कोंडाळकर, छाया किरण भिलारे, मुक्ता तुळशीराम भिलारे, स्वाती प्रमोद पाटणे, मेघा राहुल निगडे, वैशाली खंडू मोहिते, प्रियांका प्रशांत निगडे, किरण दीपक निगडे, रोहिणी उमेश काकडे, रुपाली विलास लेकावळे, कल्पना सतीश आवाळे, रुपाली संतोष बाठे, अंकिता विवेक बाठे, स्वाती साळुंखे, सपकाळ मावशी, पल्लवी उरसळ, आशा गुरव, मनीषा कांबळे, मेघा लोंढे, सुनंदा सुरेश माळी, मेघा माळी, माधुरी बाठे, सोनाली निगडे व वर्षा कदम यांना सन्मानित करण्यात आले.