सामाजिक

मोरवडीतील अवैद्य मुरूम माती उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई कधी ( भाग 3)


 

मोरवडीतील अवैद्य मुरूम माती उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई कधी
( भाग 3)
पुणे वैभव: न्यूज नेटवर्क भोर

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लॉटिंग व्यवसाय जोमात सुरू आहे.
भोर तालुक्यातील मोरवाडी येथे गेली अनेक दिवसापासून गट नंबर 610 चे जमीन मालक पंकज सूर्यकांत गुजर यांनी अवैध रित्या जवळजवळ 8 ते 10 हजार ब्रास मुरूम माती चे उत्खनन करून मोठ मोठ्या टेकड्या फोडून प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी गुजर यांनी महसूल विभाग भोर यांच्या पासून कोणत्याही प्रकारचा परवाना काढलेला नसताना देखील दिवस रात्र महसूल विभागाच्या नाकावर टीचून जेसीबी पोकल्यान ट्रॅक्टर डंपर च्या साह्याने प्लॉटिंग व्यवसाय जोमात सुरू आहे.
किकवी मंडल अधिकारी पांडुरंग लहारे व तलाठी ओंकार गिरी यांनी काही दिवसापूर्वी प्लॉटिंग चालू असलेले ठिकाणी जाऊन दंडात्मक कारवाई केलेली होती पण दंडात्मक कारवाई केलेला पंचनामा अद्याप भोर तहसीलदार कचेरी मध्ये जमा केलेला नसून ही कारवाई का थांबली असा सवाल मोरवाडी व परिसरातील नागरिक करत आहेत.
जर दंडात्मक कारवाई झाली तर मोरवाडी ग्रामपंचायतीला सार्वजनिक कामे करण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध होईल .
पण महसूल विभाग कर्मचारी स्वतःचे खिशे भरून नेमके कोणाचे काम करत आहे अशी चर्चा गावातील नागरिक करत आहेत.
शेतजमिनींचे रूपांतर बेकायदेशीरपणे निवासी प्लॉटमध्ये केले जात असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम व माती काढून भूभाग सपाट केला जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.
. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून भविष्यात शेतीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महसूल व खनिज विभागाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.