किकवी विद्यालयात 15 ऑगस्ट निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
किकवी विद्यालयात 15 ऑगस्ट निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर / किकवी
किकवी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्या दिना निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 10 च्या सर्व विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता
किकवी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडत स्पर्धेत सहभाग घेतला.
विध्यार्थ्यांना . माझा आवडता स्वातंत्र्या सेनानी . स्वातंत्र्या दिन. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत, शिक्षणाचे महत्त्व, माझा भारत देश महान, वृक्षसंवर्धन, मोबाईलचे फायदे व तोटे आदी विषय देण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर सुंदर व आशयपूर्ण निबंध लिहून आपल्या लेखनकौशल्याचे दर्शन घडविले.
निबंध लेखनातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला आणि लेखनकौशल्याला चालना मिळाली. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरणविषयक प्रश्नांवर आपले विचार मांडले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद राऊत सर जाधवर सर बोबडे सर मगर सर मोरे सर धानवले सर. सुतार म्याडम . राऊत म्याडम . दळवी म्याडम. वीर म्याडम. कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक विनोद राऊत सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे सांगितले.
निबंध स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले.


