शिक्षण-प्रशिक्षण

राज्यस्तरीय शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत नसरापूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


 

राज्यस्तरीय शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धेत नसरापूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे वैभव:न्यूज नेटवर्क नसरापूर / भोर

16 ऑक्टोबर 2025  गुरुवार रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे संचलित श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नसरापूर विद्यालयातील काही खेळाडू विद्यार्थी राज्य स्तरीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धे मध्ये सहभाग घेण्यासाठी संभाजीनगर येथे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर द्वारा आयोजित तायक्वांदो स्पर्धा सन 2025 -26 आयोजित करण्यात आलेली होती.
या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालयामधील कला शाखेमध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. कुणाल सुभाष गोळे व विज्ञान शाखेमध्ये शिकणारी कु. पूर्वा बबन मेमाणे हे विद्यार्थी सहभागी झालेले होते. या दोन्हीही विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर तायक्वांदो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून अभिमानास्पद कामगिरी असल्यामुळे नसरापूर विद्यालयातील व परिसरातील गावांमधील नागरिक कुणाल . व पूर्वा चे कौतुक करत आहेत.
अतिशय हुशार होतकरू आणि मेहनती असे हे विद्यार्थी आहेत.

विद्यालयाचे कार्य कुशल असणारे प्राचार्य श्री. यादव एस एस , पर्यवेक्षक श्री. हिंगाणे एस एस, विभाग प्रमुख श्री. मिसाळ वाय एम, तसेच क्रीडा शिक्षक श्री.धेंडे व्ही एस सर यांनी या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या  मेहनतीला सलाम करताना त्यांना अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यालयासाठी आणि संस्थेसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की, असे मेहनती आणि कष्टाळू विद्यार्थी आमच्या विद्यालयामध्ये शिकत आहेत असे आपले विचार प्राचार्यांनी मांडले.
सततचा सराव आणि कडी मेहनत या जोरावरच या आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे  असे मत कुणालच्या वर्गशिक्षिका श्रीम.मोहोळ एस एस मॅडम व श्री. गायकवाड एम बी सर यांनी व्यक्त केले.
इतरही विषय शिक्षक श्रीम. पवार टी व्ही मॅडम, श्री खंडागळे यु एम,श्री.लावंड यु ए, श्री. कदम एस एस, श्री कड  सर, श्री पाटील सर, श्री दाभाडे सर, श्री कुंभार सर, श्रीम कदम एस.के मॅडम यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना शुभेच्छांचा वर्षाव केला.
कुणालचे कोच जितेंद्र भगत यांनी देखील कुणाल कडून अतिशय उत्तम पद्धतीने सराव करून घेतल्यामुळेच हे यश प्राप्त झालेले आहे. भगत सरांनी देखील कुणाल आणि पूर्वा यांच्या या कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या
कुणाल गोळे व पूर्व मेमानेचे आई वडील यांचे शुभ आशीर्वाद व पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यामुळेच ही मुलं यश गाठत आहेत.
खेळामध्ये हार आणि जीत दोन्ही असते.परंतु तुमची कडी मेहनत आणि सराव यामुळेच तुम्हाला यश प्राप्त होत असते. अपयशातून धडे घेतच यश प्राप्त होत असते. विद्यार्थ्यांनी केलेली कष्ट,मेहनत सराव हा कधीही वाया जात नाही त्याची निश्चितपणे फलप्राप्ती होतेच. हेच या विद्यार्थ्यांच्या यशातून समजते.
विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने या दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.