राजकीय

रोहन बाठे विजयी झाल्यामुळे भोंगवली गणातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण


 

रोहन बाठे विजयी झाल्यामुळे भोंगवली गणातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर

भोर तालुक्यातील भोंगवली गणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहन बाठे यांचा दणदणीत विजय झाल्यामुळे भोंगवली गणातील मतदार नागरिक यांच्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत फटाके फोडून व मिठाई वाटप करून विजय साजरा केला.
रोहन बाठे यांनी सुरुवातीपासूनच विकासाचा मुद्दा पुढे ठेवत मतदारांशी थेट संवाद साधला होता. गावातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार रोहन बाठे यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय माझा नसून जनतेचा आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास विकासकामांद्वारे सार्थ ठरवू,” असे सांगितले. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, भोंगवली गणातील विविध भागांतून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या विजयाचे स्वागत करत परिसराच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या रोहन बाठे यांच्या विजयामुळे मतदारांमध्ये समाधानाचे आणि नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.