भोंगवली कामथडी गटामध्ये महादेव सोनवणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भोंगवली कामथडी गटामध्ये महादेव सोनवणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे वैभव न्यूज नेटवर्क भोर
भोर तालुक्यातील भोंगवली कामथडी गटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार महादेव सोनवणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असलेले चित्र पाहायला मिळत आहे
महादेव सोनवणे यांचे वडील के डी भाऊ सोनवणे यांनी गेली अनेक वर्षांपासून भोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे के डी भाऊ यांनी राजगड सहकारी साखर कारखान्या वर संचालक म्हणून काम करत असताना नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण अवलंबल्यामुळे आज के डी भाऊंना शेतकरी महिला पुरुष मतदार .
मतदान स्वरूपात आपले मत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महादेव सोनवणे यांना देणार असल्याची चर्चा मतदार करत आहेत.
राजकारणातून समाजकारण करत असताना के डी भाऊ सोनवणे यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम केले आहे.
के डी भाऊ सोनवणे यांचा वारसा लाभलेले महादेव सोनवणे यांनी गेली अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक होतकरू तरुण युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून काम करत असल्यामुळे .
भोंगवली कामथडी गटातील सर्व शिवसैनिक एक निष्ठेने काम करणार असून येणाऱ्या निवडणुकीत महादेव सोनवणे हे बहुमताने विजयी होतील असे मत मतदार राजा व्यक्त करत आहे.


