आरोग्य

डॉ मंदार माळी यांनी राजगड तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन केली यशस्वी नॉर्मल प्रसूती


 

डॉ मंदार माळी यांनी राजगड तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन केली यशस्वी नॉर्मल प्रसूती

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

भोर तालुक्यातील किकवी येथील 108 गाडीवरील एमरजेन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी यांनी राजगड तालुक्यातील बोर्डी गावातील महिलेची येशस्वी नॉर्मल प्रसूती केली आहे.
दिनांक २४. फेब्रुवारी .२६ रोजी राजगड तालुक्यातील बोर्डी या गावातील एका महिलेला प्रसूती अगोदरच्या कळा चालू झाल्या आहेत असा सबसेन्टर ला कॉल आला यावेळी किकवी 108 गाडीचे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी व पायलट विशाल कदम यांचा किकवी येथून राजगड तालुक्यातील बोर्डी येथे जाण्यासासाठी तब्बल ७५ किलोमीटर चा प्रवास सुरु झाला
पण गाव दुर्गम भागात असल्या मुळे बोर्डी येथे पोहचण्यासाठी डॉ मंदार माळी व पायलट विशाल कदम यांना तारेवरची कसरत करावी लागली रस्त्याची कामे चालू असली तरी रस्ता खराब व मोबाईल नेटवर्क कमी असल्यामुळे मोठ्या जिकिरीने बोर्डी गावात 75 किलोमीटर पार करून वेळेत प्रसूती पेशंट ठिकाणी डॉ पोहचले पण कळा जास्त प्रमाणात सुरु असल्यामुळे डॉ मंदार माळी यांनी घरीच नातेवाईक व परिचारक यांच्या मदतीने व्यवस्थित रित्या सुखरूप प्रसूती केली.
प्रसूती नंतर पुढील उपचारासाठी राजगड ग्रामीण रुग्णालयात पेशन्टला सोडले
पण डॉ मंदार माळी यांनी घडाळाच्या काट्यावर वेळेत कसे काम करायचे हे दाखवून दिल्या मुळे.
पेशंट व नातेवाईक यांनी १०८ अत्यवश्याक व्यवस्था तसेच डिस्ट्रिक्ट मैनेजर सुजित पाटील एडीएम संतोष येनपुरे व डॉ मंदार माळी व पायलट विशाल कदम यांचे आभार मानले