आरोग्य

सारोळे उपकेंद्रात 30 गरोदर मातांची केली तपासणी डॉ मंदार माळी यांनी गर्भवती मातांना केले मार्गदर्शन


 

सारोळे उपकेंद्रात 30 गरोदर मातांची केली तपासणी डॉ मंदार माळी यांनी गर्भवती मातांना केले मार्गदर्शन

आज दिनांक 12/11/25 रोजी गरोदर माता तपासणी शिबिर उपकेंद्र सारोळा येथे आयोजित करण्यात आले होते.
या. शिबिरामध्ये गरोदर माता ची रक्त तपासणी ,बी पी , रक्तातील साखर,तपासणी पोटावरून तपासणी करण्यात आली.या वेळी 30 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. व त्यांना सर्व शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला
प्रसूती पूर्वी मातांनी आपली व होणाऱ्या बाळाची कश्या प्रकारे काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन 108 गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी यांनी गर्भवती मातांना केले

या वेळी 108 गाडीवरील मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी भोंगवली पी एच सी च्या मेडिकल ऑफिसर डॉ मेघा लोंढे. डॉ सोनाली जगताप. मनीषा कांबळे. 108 पुणे जिल्हा मॅनेजर प्रियांक जावळे . लॅब टेक्निकल शलाका साळुंखे . ए डी एम सुजित पाटील. भारती सोनवणे . प्रतिभा साळुंखे. विजया पवार. साधना साळुंखे . 108 गाडीवरील चालक विशाल कदम. कल्पना धाडवे. आदी कर्माचारी उपस्थित होते.