कामथडी गणातील गावांमधील गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
कामथडी गणातील गावांमधील गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर
भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातील गावांमधील महिलांना आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून.
उद्योजक प्रफुल धुमाळ यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धा चे आयोजित केली होती.
गौरी गणपती सजावट स्पर्धा मध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतला होता त्या सर्व महिलांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या स्पर्धेत
1) जयश्री अमोल वाल्हेकर यांनी प्रथम क्रमांक बक्षीस फ्रिज
2) राजश्री प्रसाद विर यांनी द्वितीय क्रमांक टी व्ही
3). अनिता प्रमोद लेकावले यांनी तृतीय क्रमांक वॉशिंग मशिन
4) सारिका चव्हाण यांनी चतुर्थ क्रमांक आटा चक्की
5) मनीषा बोरगे यांनी पाचवा क्रमांक मिक्सर
अश्या पहिल्या पाच नंबर महिलांनी उत्कृष्ट सजावट केल्याने नंबर पटकावला तर
या स्पर्धेत ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतला होता त्या सर्व महिलांना उत्कृष्ट बक्षीस क्रांति प्रफुल धुमाळ , यांच्या वतीने देण्यात आले.
या वेळी कामथडी भोगवली गटात कुलदीप तात्या कोंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाला उमेदवारी निश्चित केली तर एकनाथ शिंदे शिवसेना गट वर्चस्व दाखऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागा सहजपणे जिंकून येतील अशी चर्चा
मतदारांच्यात रंगली होती.
कामथडी भोगवली गट हा कुलदीप तात्या कोंडे यांचा बालेकिल्ला समजला जातो या गटांमधील सर्व पक्षीय मतदार हा कुलदीप तात्या कोंडे यांच्या उमेदवारीची मागणी करत असून .
भोगवली कामथडी गटात कुलदीप तात्या कोंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाला निवडणूक लढवावी अशी मागणी मतदार करत आहेत.


