वन विभागाच्या हदीत मध पोळे काढताना झाडावरून पडून मृत पावलेल्या तरुणाला न्याय कधी
वन विभागाच्या हदीत मध पोळे काढताना झाडावरून पडून मृत पावलेल्या तरुणाला न्याय कधी
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर : भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिर परिसरात मधमाश्यांचे पोळे काढताना झालेल्या दुर्दैवी घटनेत एका आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे,
मंगळवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास अगी महू काढण्याचे काम सुरू असताना विष्णू मारुती पवार झाडावर उंच फांदीवर मध काढण्याचे काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी व उपस्थितांनी तातडीने त्याला नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
झालेली घटना वन विभागाच्या हद्दीत झाल्यामुळे हे मध पोळे काढण्यात वन विभागातील काही अधिकारी यांनी सायबू मुकणे याला सांगितले असल्याचे सायबू मुकणे याने फोन वर्ती बोलताना सांगितले असल्यामुळे
भोर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती लहू नाना शेलार व समाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिंरंडे यांनी राजगड पोलीस स्टेशन नसरापूर येथे वन विभागातील दोषी अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिल्या मुळे
बनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव श्री. अनिल भा. गायवळ (रा. नसरापूर) व सायबू मारुती मुकणे ( रा वागजवाडी) यांच्यावर स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी वन विभागात आग लावून मध पोळे काढले म्हणून स्वतःचा पेन चालवत गुन्हा दाखल केला आहे अशी चर्चा नसरापूर परिसरातील नागरिक करत आहेत.
पण एक निष्पाप तरुण युवक आपल्या प्रणाला मुकला असून मृत विष्णू मारुती पवार याला न्याय कधी मिळणार अशी पण चर्चा आहे.
श्री. सायबू मारुती मुकणे (रा. वाघजवाडी, किकवी, ता. भोर) व इतर मजुरांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वनक्षेत्रात प्रवेश करून हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले. यानंतर वन विभागाने संबंधितांविरुद्ध Indian Forest Act, 1927 (भारतीय वन अधिनियम १९२७) तसेच Wildlife Protection Act, 1972 (वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्र. जा.क्र./गुन्हा/८९०/२०२५-२६ दिनांक १९ मार्च २०२६ असा नोंदविण्यात् आला.
गोर गरीब आदिवासी समाजातील तरुण आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी जीवावर उदार होऊन घातकी काम करण्याचे धाडस करत असतात याचा फायदा धन दांडगे घेतात हे कुठे तरी थांबावे व मृत विष्णू पवार याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील दोन दिवसात भोपाळ येथील मुख्य वन विभाग कार्यालयात पत्रा द्वारे व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समक्ष निवेदन देणार असल्याचे लहू नाना शेलार यांनी सांगितले आहे.


