क्राईम

महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत चोरीची कार जप्त; तीन आरोपी ताब्यात


महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत चोरीची कार जप्त; तीन आरोपी ताब्यात

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर

[दिनांक] : 09/07/2026 रोजी
पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष व राजगड पोलीस ठाणे यांच्याकडून भिवंडी (मुंबई) येथून चोरीस गेलेली मारुती सुझुकी अर्टिगा (क्र. MH 04 KR 2357) ही कार खेड शिवापूर टोल नाका पार करून साताऱ्याच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

सदर माहिती मिळताच सारोळा TAP चे प्रभारी API हणमंत पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापुरहोळ चौक येथे राजगड पोलीस ठाण्याच्या समन्वयाने तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईदरम्यान चोरीची कार अडविण्यात आली असून, त्यामधील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी तसेच चोरीस गेलेले वाहन पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी सारोळा TAP चे प्रभारी API हणमंत पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश ओव्हाळ पोलीस कॉन्स्टेबल ( ब . क्र 1183 ) PSI धुमाळ, हेड कॉन्स्टेबल सय्यद (ब.क्र. 343), हेड कॉन्स्टेबल निगडे (ब.क्र. 1879), हेड कॉन्स्टेबल पाटोळे (ब.क्र. 999) व पोलीस कॉन्स्टेबल जाधव (ब.क्र. 2843) यांनी राजगड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पाडळकर व पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांच्या समन्वयाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सारोळा TAP व राजगड पोलीस यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे, उत्कृष्ट समन्वयामुळे व सतर्कतेमुळे चोरीचे वाहन जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.