महत्त्वाचे

कुंपणच खातंय शेत प्लॉटिंग करणाऱ्या जमीन मालकांना महसूल विभागाचा आशीर्वाद ( भाग 2)


कुंपणच खातंय शेत प्लॉटिंग करणाऱ्या जमीन मालकांना महसूल विभागाचा आशीर्वाद
( भाग 2)

पुणे वैभव : भोर

भोर तालुक्यातील मोरवाडी पाचलिंग येथे गेली अनेक दिवसापासून अवैध्य टेकड्या फोडून मुरूम माती चे उत्खनन करत प्लॉटिंग करत असलेल्या जमीन मालकांना महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत.
पुरंदर किल्याच्या पायथ्याशी असलेल्या पांडव कालिन पंचलिंग देवाच्या परिसरात म्हणजे मोरवाडी पाचलिंग परिसरात गेली अनेक दिवसापासून अवैध्य उत्खनन करून स्वतःच्या फायद्यासाठी टेकडी माळ रानाच्या जमिनी फोडून जवळजवळ चार ते पाच हजार ब्रास मुरूम माती चे अनधिकृत उत्खनन करून प्लॉटिंग व्यवसाय जोमात सुरु आहे.
महसूल विभागापासून् उत्खनन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे परवाने घेतलेले नसताना सुद्धा महसूल विभागाचा कर बुडवत काही कर्मचारी अधिकारी हताशी धरून अवैध्य दिवस रात्र मुरूम माती उत्खनन करून प्लॉटिंग करण्याचे काम जोमात सुरु आहे.
किकवी मंडळ अधिकारी लहारे यांनी घटना स्थळी पाहणी करून दांडात्मक पंचनामा केला पण केलेला पंचनामा अजून पर्यंत भोर तहसील कार्यालय मध्ये जमा केलेला नाही.
लहारे यांना पंचनाम्याविषयीं माहिती विचारली असता उडवा उडविची उत्तरे मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
जर हा दांडात्मक पंचनामा झाला तर मोरवाडी ग्रामपंचायतीला 50 टक्के महसून गाव विकासासाठी मिळेल व गावचा विकास होईल पण कुंपणच शेत खातंय असे चित्र दिसत असून महसूल विभागाचा अवैध्य मुरूम माती उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या जमीन मालकांना आशीर्वाद असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत.
तरी भोर उपविभागीय अधिकारी खरात साहेब. व तहसीलदार नजन साहेब हे संविधानिक भूमिका घेऊन कार्यवाहीचे आदेश देणार का अशी चर्चा नागरिक करत आहेत