आरोग्य

दत्त जयंती निमित्त नारायणपूर येथे 108 गाडी 24 तास दत्त भक्तांच्या सेवेत


 

दत्त जयंती निमित्त नारायणपूर येथे 108 गाडी 24 तास दत्त भक्तांच्या सेवेत

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

नारायणपुर/ पुरंदर

2 डिसेम्बर ते 4 डिसेम्बर 2025 पर्यंत दत्त जयंती निमित्त 108 गाडीवरील एमरजेन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी व त्यांची टीम दत्त भक्तांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी नारायणपुर येथे 24 तास मोफत सेवा देणार आहेत.

आज पहिल्या दिवशी किकवी सबसेंटर भोर येथील १०८ रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा तसेच ओ पी डी सेवा देण्यासाठी श्री शेत्र नारायणपूर येथे उपलब्ध आहे त्यात इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी तसेच पायलट विशाल कदम पायलट दामोदर आहिरे यांनी आज १०० किरकोळ सर्दी ताप खोकला जुलाब पोटदुखी पायदुखी असे तसेच एक इमर्जन्सी कॉल हँडेल केला त्यासाठी १०८ अत्यावश्यक सेवा तसेच व्यवस्थापक श्री पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री डॉ प्रियांक जावळे व एडीएम सुजित पाटील सर व श्री संतोष येनपुरे सर यांच्या मार्गदर्शन व व्यवस्थापन यासाठी ट्रस्ट व कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांनी विशेष आभार मानले