आदित्य बोरगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश
आदित्य बोरगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर नगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला भोर तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत् शिवसेना उभाटा गटाचे युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे व त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप पक्षा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
आदित्य बोरगे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केल्याने शिवसेना उभाटा गटाला मोठ्या प्रमाणात खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे.
आदित्य बोरगे यांनी गेली एक दशका पासून कार्यकर्त ते युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख पद भूषवले आहे ग्रामीण भागात शिवसेना घराघरात पोहचवण्याचे काम केल्यामुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आदित्य बोरगे यांच्या सोबत असल्यामुळे .
शिंदेवाडी ते गुणंद पर्यंत भारतीय जनता पक्षाची ताकत मोठ्या प्रमाणात आदित्य बोरगे वाढवतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.
आदित्य बोरगे यांनी भारतीय जनता पक्षात् प्रवेश केल्याने करंदी खे बा . कामथडी. नसरापूर. कापूरहोळ. परिसरातील इतर गावांमधील युवा वर्ग आनंदित झाल्याचे पाहायला मिळाले.


