कामथडी भोंगवली जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात चैतन्य ( कौल जनतेचा )
कामथडी भोंगवली जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात चैतन्य
( कौल जनतेचा )
पुणे वैभव : भोर
निवडणूक रणधुमाळीला वेग आला असताना शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या कामथडी भोंगवली जिल्हा परिषद मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद उमेदवार महादेव सोनवणे व विकास चव्हाण .आणि क्रांती धुमाळ यांच्या
गावोगावी होणाऱ्या भेटी, पदयात्रा, आणि घराघरांत जाऊन होणाऱ्या संवादाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान युवक, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून,
शिवसेनेच्या पारंपरिक शैलीतील प्रचारामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून उमेदवारांची भेट घेत आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडत आहेत.
विशेषतः स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद होत असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.
महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगार यासंदर्भातील मुद्द्यांवर उमेदवारांनी दिलेल्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. युवक वर्ग रोजगार, शिक्षण व क्रीडा सुविधांबाबत उमेदवारांशी चर्चा करताना दिसून येत आहे.
शेतकरी वर्गाकडून पाणीटंचाई, पीक विमा, हमीभाव आणि वीजपुरवठा या प्रश्नांवर अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या असून, या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले आहे.
आमच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष भेटून ऐकणारा नेता म्हणून शिवसेना उमेदवारांकडे पाहतो,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली.
एकूणच शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारसंघात निवडणुकीबाबत उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरणाचे चित्र निर्माण झाले आहे.


