वेळू नसरापूर गटात पोपट सुके यांना मतदारांची पहिली पसंती ( कौल जनतेचा)
वेळू नसरापूर गटात पोपट सुके यांना मतदारांची पहिली पसंती
( कौल जनतेचा)
पुणे वैभव: भोर
भोर तालुक्यातील वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पोपट सुके यांना मतदारांची पहिली पसंती असल्याचे चित्र दिसत आहे.
गेली अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात गुणवंत समाज कार्य करत असलेले.
नवसाह्याद्री ग्रुप चे मालक पोपट सुके यांनी अनेक तरुण युवक युवतींना शिक्षण घेण्यासाठी सढलं हाताने मदत केली आहे.
राजकारण नाही तर समाजकारण करणारा नेता असलेला उमेदवार वेळू नसरापूर गटाला मिळाला असल्यामुळे लहान थोर तरुण युवक युवतींनी पोपट सुके यांची निवडणूक हाती घेतली असून पोपट सुके यांना मतदारांचे बहुमत असल्याचे दिसत आहे.
पक्षाने कुणाला तिकीट दिले कुणाला नाही दिले या पेक्षा पोपट सुके यांना उमेदवारी मिळाली म्हणून वेळू नसरापूर गटातील मतदार आनंदित असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्यांनी आज पर्यंत वडा पाव खाऊ नाही घातला त्या उमेदवाराने फक्त स्वतःच्या स्वार्थ साठी निवडणुकी मध्ये मतदान मिळावे म्हणून मोठ मोठ्या बस भरून कोकण दर्शन दाखवत आहे .
पण वेळू नसरापूर गणातील मतदार सुज्ञ असून मतदाना दिवशी या स्वार्थी लोकांना त्यांची जागा दाखवतील अशी चर्चा वेळू नसरापूर गटात जोरात सुरु आहे
घोडे बाजार किती जरी जोरात भरला तरी मतदार जागरूक आहे. कोण किती स्वार्थी पणा करतो आणि कशासाठी करतो हे मतदारांना समजत आहे. म्हणून आमचे मत फक्त भारतीय जनता पक्षातील उमेदवारांना अशी जोरदार चर्चा सध्या वेळू नसरापूर गटात चालू आहे.


