विंझर–पानशेत गटात राष्ट्रवादीची ताकद वाढली; अमोल नलावडेंची विजयाकडे भक्कम वाटचाल
विंझर–पानशेत गटात राष्ट्रवादीची ताकद वाढली; अमोल नलावडेंची विजयाकडे भक्कम वाटचाल
पुणे वैभव :
राजगड प्रतिनिधी
:- राजगड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचा जोर वाढत असताना आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमुळे विंझर –पानशेत गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांचा पुन्हा एकदा विजय निश्चित मानला जात आहे.
कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भगवान पासलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे विंझर –पानशेत गटातील राजकीय समीकरणे राष्ट्रवादीच्या बाजूने झुकली आहेत.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली आहे. उद्योजक अशोक ऊर्फ लाला शेठ रेणुसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्यास प्राधान्य दिले असून, दापोडे गावचे डॉ. शेंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे विंझर.–पानशेत गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
शंकर मांडेकर आमदार झाल्यापासून. राजगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सातत्याने वाढताना दिसत आहे. तालुकाध्यक्ष किरण राऊत यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घेतलेले अहोरात्र प्रयत्न आणि करोड रुपयांची केलेली कामे यामुळेच आज पक्षाला चांगले दिवस आले असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजगड तालुक्यात विजय मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमोल नलावडे यांनी मागील दहा वर्षांपासून विंझर –पानशेत गटात केलेल्या विविध विकासकामांचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. विकासकामे, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे जनतेत त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शंकर मांडेकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली, हे नलावडे यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे.
अमोल नलावडे यांच्यासोबत विंझर गणात अंकुश दसवडकर आणि पानशेत गणात सुवर्णा राऊत हे उमेदवारही मैदानात असून, तिन्ही उमेदवार ताकतीचे मानले जात आहेत. आजच्या माघारीच्या दिवसानंतर, उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र विंझर –पानशेत गटात दिसून येत आहे.


