राजकीय

वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील भाजप चे शिक्षण सम्राट उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील भाजप चे शिक्षण सम्राट उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर तालुक्यातील सर्वात मोठा मतदार संघ असलेला वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटात
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “शिक्षण सम्राट” म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपट सुके यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाहीर सभा, घरभेटी आणि संवाद मेळावे घेतले असून, नागरिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे.
शनिवारी वर्वे येथील मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर सभेत शेकडो ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. महिलावर्ग, तरुण, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सभेला हजर होते. “शिक्षण सम्राट” म्हणून ओळख असणारा उमेदवार या वेळू नसरापूर गटाला लाभला असून येणाऱ्या काळात शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शाळा-कॉलेजसाठी पायाभूत सुविधा सुधारणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवणे आणि ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण केंद्रे उभारण्याचे कार्य पोपट सुके करतील अशी मतदाराची सभे वेळी चर्चा चालू होती.
वेळू नसरापूर गटात् पहिल्यांदाच असा उमेदवार लाभला आहे, जो शिक्षणावर इतका भर देतो. त्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत.” असे मतदार ठाम सांगत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पोपट सुके यांचे पारडे निवडणुकीत जड मानले जात आहे.