भाजप उमेदवाराला मतदारांचा वाढता पाठिंबा; परिवर्तनाची आशा व्यक्त
भाजप उमेदवाराला मतदारांचा वाढता पाठिंबा; परिवर्तनाची आशा व्यक्त
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क
भोर तालुक्यातील भोंगवली जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश दादा टापरे व भोंगवली पंचायत समिती सदस्य उमेदवार रोहन दादा बाठे आणि जिल्हा पंचायत समिती सदस्य निता ताई इंगुळकर यांना मतदारांचा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोंगवली कामथडी जिल्हा परिषद गट परिसरातील राजकीय वातावरण तापले असून भाजप उमेदवाराला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवाराला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत भाजप उमेदवाराने गावोगावी जाऊन प्रचारसभा, पदयात्रा आणि गाठीभेटी घेतल्या. या वेळी त्यांनी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, शाळा आणि रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक शेतकरी, तरुण आणि महिलांनी सांगितले की, मागील काळात विकासकामे रखडली होती, मात्र भाजप उमेदवार सत्तेवर आल्यास परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. अनेक मतदारांनी “आम्ही यावेळी बदल घडवणार आहोत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने काम करत असून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. यामुळे उमेदवाराला जनतेचा पाठिंबा वाढताना दिसत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, मतदारांचा कल पाहता भाजप उमेदवाराला निवडणुकीत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निकाल मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल.


