भोंगवली कामथडी गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदारांनी फिरवली पाठ ( कौल जनतेचा)
भोंगवली कामथडी गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदारांनी फिरवली पाठ
( कौल जनतेचा)
पुणे वैभव : भोर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भोंगवली कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये मतदार नागरिकांनी उमेदवारांना प्रतिसाद न देता प्रचारा अगोदरच पाठ फिरवली आहे.
विकास कामांचा अभाव अपूर्ण आश्वासने आणि जनतेशी तुटलेला संपर्क ही प्रमुख कारणे असल्याची चर्चा मतदारांच्या रंगलेली स्पष्ट दिसत आहे.
गेल्या काही वर्षात मतदार संघात अपेक्षित विकास कामे न झाल्याची भावना नागरिकांमध्ये होती
रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे निवडणूक आल्यानंतर फक्त उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधने स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त मतदार नागरिकांचा वापर करायचा
म्हणून भारतीय जनता पार्टीतील उमेदवारांना भोंगवली कामथडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सदस्यांना मतदारांनी पाठ फिरवली आहे


