जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या अनिश्चित्यामुळे इच्यूक उमेदवार थंडीने गारठले
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या अनिश्चित्यामुळे इच्यूक उमेदवार थंडीने गारठले
पुणे वैभव : भोर
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थान च्या निवडणुकाच्या अनिश्चिततेमुळे इच्छुक उमेदवार थंडीने गारठल्याचे मतदारांच्या चर्चा रंगत आहे.
भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत
पावट्याच्या आमटीतल्या पावट्यागत उमेदवारांची संख्या वाढली होती.
जिकडे पहावे तिकडे उमेदवार आपापल्या पद्धतीने गाव भेट दौरा दहावे. तेरावे. वाढदिवस अगदी ज्याला कोणी इतर दिवशी हुंगुन विचारणा करत नाही अश्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला उमेदवार बळबळ जात होता . महिलांसाठी देवदर्शन अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
पण फक्त निवडणूक आली की उमेदवारांच्या अंगात जसे एखद्या माणसाच्या अंगात चेडा भूत संचारावे तसे . चेडा भूत संचारलेले पाहायला मिळाले होते
पण निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे उमेदवार निपचीप गारटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इच्छुक उमेदवारांना निवडणुकीचा खर्च पेलवेना झालेला आहे .
पक्षीय तिकिटांचा नुसताच बोलबाला उमेदवार मात्र केविलवाना झाला आहे.
जर चुकून एखाद्या उमेदवाराला एखाद्या देवाच्या जत्रेला आमंत्रित केले तर तो उमेदवार आमंत्रण सोडून तेवढे वर्गणी सोडून बोला म्हणत आहे .
येणाऱ्या निवडणुकीत मतदार ही मतदान सोडून बोला असे म्हणतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
या मुळे इच्छुक उमेदवार गारठले असून इच्छुक उमेदवारांचे निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे एवढी कोंडी झाली आहे की मतदारांचा जर फोन आला तर फोन उचलू की नाही अशी गत झाली आहे.
पण मात्र मतदार हा आजही अश्या भूमिकेवर ठाम आहे की कोणाचे बी खा मटण पण आपल्या मनाने दाबावे बटन अशी भावना मतदार व्यक्त करत आहे


