ताज्या घडामोडी

भोर राजगड तालुक्यात फक्त लाल मातीचा धुरळा


 

भोर राजगड तालुक्यात फक्त लाल मातीचा धुरळा

पुणे वैभव : भोर / राजगड

भोर राजगड तालुक्यात फक्त लाल मातीचा धुरळा निघत असल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील नैसर्गिक खनिज संपत्ती संपुष्टात येत असल्यामुळे निसर्ग प्रेमी नाराज होत असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांना .
लाल माती बंद करावी म्हणून निवेदन देणार असल्याचे निसर्ग प्रेमी यांनी सांगितले आहे.

गेली अनेक वर्षापासून भोर व राजगड तालुक्यातून लाखो ब्रास लाल मातीचे अनधीकृत पणें उत्खनन होत आहे.
500 ब्रास लाल मातीचा परवाना महसूल विभागातून काढून एकाच नंबर प्लेट ने 20 ते 25 हायवा डंपर ने अनाधुंधी वाहतूक करत आहेत.

ज्या गावातून परवाना काढला आहे तेथून उत्खनन न करता दुसऱ्या गावातून लाल माती चे उत्खनन करत असून जर कोणी या लाल मातीच्या विरोधात तक्रार केली तर लाल माती उत्खनन करणारा त्या नागरिकाला या ना त्या प्रकारे दमबाजी करत असल्यामुळे हा सावळा गोंधळ सुरू आहे.

लोकशाहीत . हुकूमशाही. करत लाल मातीचा धुरळा उडवत असल्यामुळे काही निसर्ग प्रेमी यांनी सांगितले आहे की.
भोर . राजगड तालुक्यात निसर्ग पर्यटन बऱ्या पैकी आहे.
या तालुक्यात अनेक गड किल्ले आहेत. अनेक निसर्ग रम्य घाट . पठारे . धरणे. इत्यादी पॉइंट आहेत.
म्हणून शहरातील हजारो पर्यटक दररोज या तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देत असतात.

तरी पण लाल माती सारख्या लाल नैसर्गिक खनिज संपत्ती जतन करण्या ऐवजी ही खनिज संपत्ती संपुष्टात आणण्यासठी टपलेल्या लाल माती व्यावसायिक यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करून ही चालू असलेली लाल माती उत्खनन बंद करावे म्हणून थोड्या दिवसात निसर्ग प्रेमी.
पुणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे निसर्ग प्रेमी यांनी सांगितले आहे.

तरी हा व्यवसाय जोमात सुरू ठेवण्या. करीता कोणा कोणाचा सिंहाचा वाटा आहे.
हे व्यावसायिक कोणाला टेबला खालून माया पोहोचवतात.
काही दिवसा पूर्वी काही लाल माती व्यावसायिक यांनी एका मंडल अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडले होते.
म्हणून हे व्यावसायिक व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन आपली पोळी भाजून घेतली अशी चर्चा सध्या भोर. राजगड तालुक्यात सुरू झाली आहे