ताज्या घडामोडी

तायक्वांदो तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत किकवी विद्यालयातील विध्यार्थ्यांचे घवघवीत यश


  • तायक्वांदो तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत किकवी विद्यालयातील विध्यार्थ्यांचे घवघवीत यश

    पुणे वैभव : भोर

    तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा 2025 – 26 अंतर्गत तायक्वांदो स्पर्धा  नवसह्याद्री इंग्लिश मीडियम  स्कूल, नायगाव येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत किकवी शिक्षण संस्था संचलित, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी, तालुका – भोर या विद्यालयाचे तालुका स्तरावर .
    Under 17 वयोगटात
    1) कु. आरुषी भोयर
    2) कु. कार्तिकी पांगारे
    Under 14 वयोगटामध्ये
    1) विराज पांगरकर
    2) कु. तन्वी तनपुरे
    या विध्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून
    या विद्यार्थ्यांची  जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
    तसेच कु. प्रज्ञा तनपुरे  व कु. ज्ञानेश्वरी बाठे या विद्यार्थिनी द्वितीय आल्या. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक  श्री विनोद राऊत सर  व श्री अमोल बोबडे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.   संस्थेचे  अध्यक्ष श्री दत्तात्रेय भिलारे व सर्व संचालक मंडळ यांनी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यार्थी व  मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.