नेकलेस पॉइंट पर्यटकांना घालतोय भुरळ नेकलेस पॉइंट कडे महिलांची जास्त ओढ
नेकलेस पॉइंट पर्यटकांना घालतोय भुरळ
नेकलेस पॉइंट कडे महिलांची जास्त ओढ
पुणे वैभव
भोर : भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पायथ्याशी व इंगवली गावाच्या शेजारी असलेल्या.
महिलांच्या गळ्यातील नेकलेस हारा प्रमाणे दिसत असलेल्या नदीच्या वळणाचा नेकलेस पॉइंट हा सध्या पर्यटकांना भुरळ घालत असल्याचे पहायला मिळत आहे
पुणे शहरापासून अवघ्या पंचे चाळीस किलोमीटरवर्ती भोर कापूरहोळ रस्त्या कडेला इंगवली गावाशेजारी अतिशय निसर्ग नयन रम्य नेकलेस पॉइंट हा सध्या पर्यटकांना भुरळ घालत आहे.
भोर तालुक्यात असलेल्या पर्यटन स्थळा पैकी नेकलेस पॉइंट हा खास करून महिलांच्या करिता आवडीचा पॉइंट बनलेला आहे.
पाऊसाने थोडी उसंत दिल्याने पुणे मुंबई सातारा कोल्हापूर सांगली पंढरपूर बीड इत्यादी शहरापासून ते ग्रामीण भागातील बऱ्याच गावामधून पर्यटक नेकलेस पॉइंट पाहण्यासाठी येत आहेत


