सापटिकरणाच्या नावाखाली केलेल्या मुरूम माती उत्खननाचे भोर महसूल विभागाने केले दंडात्मक पंचनामे.
सापटिकरणाच्या नावाखाली केलेल्या मुरूम माती उत्खननाचे भोर महसूल विभागाने केले दंडात्मक पंचनामे.
पुणे वैभव : पुणे भोर
भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील जमीन गट नंबर 110/ अ मध्ये जमीन मालक देविदास मुंडफणे यांनी भोर तहसीलदार राजेंद्र नजण यांच्या वतीने सपाटीकरण करण्यासाठी गौण खनिज परवाना घेतला होता.
पण शिंदेवाडी गावात कोणत्याही प्रकारचे डोंगर दऱ्या टेकड्या पोखरणे बंद आहे.
कारण 2011 साली एका बिल्डर ने डोंगर पोखरून हजारो ब्रास मुरूम माती चे उत्खनन केले होते आणि या परिसरात जोरदार पडलेल्या पावसामुळे.
पुणे सातारा महामार्गावर पाण्याचा भला मोठा लोंढा आल्याने पाण्यात वाहून गेल्याने एका आई व लेकीचा निष्पाप जीव गेला होता
या झालेल्या घटनेची सविस्तर माहिती.
दैनिक पुणे वैभव मध्ये प्रसिद्ध झाल्यावर माहिती आधारे.
भोर तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र नजन. यांच्या ही गंभीर बाब लक्षात आल्याने .
शिंदेवाडी गावचे तलाठी सतीश काशीद यांना ताबडतोब रीतसर दंडात्मक कारवाई पंचनामा करण्याचा आदेश दिला .
स्वतःच्या फायद्यासाठी महसूल विभागाकडून चुकीच्या पद्धतीने सपाटीकरण करण्यासाठी घेतलेल्या गौण खनिज परवाना गट नंबर 110/ अ मध्ये शिंदेवाडी गावचे तलाठी सतीश काशीद यांनी रीतसर दंडात्मक कारवाई केली असून .
कारवाही दंडात्मक पंचनामा तहसील कार्यालयात जमा केला आहे.


