पुणे शहरातील केमिकल युक्त प्लास्टिक टाकाऊ कचरा शिंदेवाडी गावच्या हद्दीत
पुणे शहरातील केमिकल युक्त प्लास्टिक टाकाऊ कचरा शिंदेवाडी गावच्या हद्दीत
पुणे वैभव , पुणे / भोर
पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेले भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावचे हद्दीत पुणे शहरांमधील केमिकल युक्त प्लास्टिक टाकाऊ कचरा हा राष्ट्रीय महामार्ग एन एच आय च्या जागेमध्ये राजरोसपणे टाकत असून या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे शिंदेवाडी गावातील लहान थोर नागरिकांना आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत व शिंदेवाडी गावातील अनेक नागरिक विविध प्रकारच्या आजाराला बळी पडत आहेत
हा टाकाऊ कचरा व प्लॅस्टिक युक्त केमिकल जाळल्यामुळे हवेच्या मार्फत वातावरणात दूषित व्हायरस तयार होऊन शिंदेवाडी गावातील लहान थोर युवकांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असून .
पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी निर्माण झाले असल्याची माहिती. शिंदेवाडी गावातील सरपंच व नागरिक यांनी दिली
तरी शिंदेवाडी गावचे हद्दीत टाकत असलेला केमिकल युक्त प्लास्टिक टाकाऊ कचरा टाकने बंद करावे नाहीतर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात शिंदेवाडी गावातील नागरिक आंदोलन करणार असल्याचे माहिती .
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक माऊली शिंदे यांनी दिली
या वेळी. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक माऊली शिंदे .शिंदेवाडी गावच्या सरपंच रोहिणी गोगावले . माजी सरपंच अरविंद शिंदे. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना भोर तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे सदस्य शारदा शिंदे मारुती गोगावले दत्तात्रेय शिंदे मयूर गोगावले. वाडी गावचे ग्राम विकास अधिकारी नवनाथ झोळ. तलाठी सतीश काशीद. यांनी तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शासन दरबारी केली आहे.


