भोर तालुक्यात सपाटीकारणाच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम माती चे मनमुराद उत्खनन
भोर तालुक्यात सपाटीकरणाच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम माती चे मनमुराद उत्खनन.
पुणे वैभव : पुणे/ भोर
भोर तालुक्यात सपाटीकरणाच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम.माती चे मनमुराद सर्रास उत्खनन होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिंदेवाडी गावात पुणे. मुंबई. सारख्या शहरातील बिल्डरांनी कवडी मोलात घेतलेल्या डोंगर जमिनी डेव्हलोप करण्यासाठी सुरुवात केली आहे. पण शिंदेवाडी गावाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे डोंगर पोखरून मुरूम . माती. उत्खनन करणे हे बंद असून या परिसरात महसूल विभागा मार्फत परवाना दिला जात नाही. कारण
2011 सालीं एका बिल्डर ने डोंगर पोखरून हजारो ब्रास मुरूम माती चे उत्खनन केले होते.
आणि या उत्खननाने जोरदार पडलेल्या पावसामुळे डोंगर फुटून भला मोठा पाण्याचा लोंढा पुणे सातारा महामार्गावर आला व त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये एका आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अजूनही या दुर्दैवी घटनेची आठवण ताजी असून सुद्धा शिंदेवाडी गावातील जमीन गट नंबर 110/ अ मधे देविदास मुंडफने यांना व सेनेमिरो कंपनी च्या मालकांना भोर तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी तात्पुरता सपाटीकरणाचा गौण खनिज परवाना दिला आहे.
या सपाटीकारणाच्या गैन खनिज परवाण्याचा जमीन मालक दारू गोळा सुरुंग लावून विस ते पंचवीस फुट खोल डोंगर मोठ मोठे पोखल्यानं लावून उकरत आहेत .
सुरुंग लावण्याने जवळ पासच्या डोंगर टेकड्याना सुरुंगाच्या हाद्र्याने तडे जाऊन पुन्हा 2011 ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असल्याचे नागरिक चर्चा करत आहेत.
जर या सपाटीकरण गौण खनिज परवान्या मुळे महसूल विभागाला एकही रुपयाचा महसूल जमा होणार नसेल तर हा गौण खनिज परवाना भोर चे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी कशासाठी दिला ? अशी चर्चा भोर तालुक्यातील नागरिक करत आहेत.
भोर उपविभागीय अधिकारी विकास खरात हे या गांभीर बाबीकडे काळजी पूर्वक पाहून भोर तहसीलदार यांना कार्यवाही करण्याचे आदेश देतील का अशी ही कुजबुज सुरु असून.
शिंदेवाडी गावच्या हद्दीतील.
सेनेमिरो कंपनीच्या परिसरातील व जमीन गट न 110/अ मधे जेवढे उत्खनन झाले त्याचा पंचनामा करून कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत असून.
हे चालू असलेले काम ताबडतोब बंद करून दंडात्मक कारवाईची मागणी नागरिक करत असून.
जर कारवाई झाली नाही तर भोर तालुक्यातील नागरिक पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये येणाऱ्या दिवसात आंदोलन करणार असल्याची चर्चा भोर तालुक्यात जोरदार चालू आहे.


