महत्त्वाचे

वागजवाडी गावातील विध्युत रोहित्रावर गावच्या कर्मचाऱ्याला बसला जोरदार विजेचा करंट


वागजवाडी गावातील विध्युत रोहित्रावर गावच्या कर्मचाऱ्याला बसला जोरदार विजेचा करंट

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

भोर तालुक्यातील वागजवाडी गावातील ग्रामपंचायतीचे कर्मचारी अजित राऊत याला गावच्या विध्युत रोहित्रावर फुईज टाकताना जोरदार करंट बसला आहे.

पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या वागजवाडी गावची लोक संख्या जवळजवळ दोन हजार च्या आसपास आहे.
पण या गावाला महावितरण कडून ज्या प्रमाणात लाईट ची गरज आहे त्या पद्धतीत मिळत नाही.

गावचे विध्युत रोहितरावर वागजवाडी गावच्या हद्दीत असलेल्या एम आय ट्यान्क धरण मधील पाणी उपसण्या साठी शेकडो मोटर लाईट च्या वेळेत कायम सुरु असल्यामुळे .
वागजवाडी गावातील लोकांना लाईट चे समस्यांना कायम समोरे जावे लागत आहे.
वागजवाडी गावच्या सरपंच निकिता आवाळे. यांनी महावितरण किकवी भोर व सासवड चे कार्यकारी अभियंता यांना नवीन रोहित्र बसवण्यासाठी तीन ते चार वेळा पत्र देऊन सुद्धा .
महावितरण कडून चाल ढकल टाळाटाळ करत आहेत.
शनिवार दि 11 ऑक्टोबर रोजी सकाळी गावचे पाणी चालू असताना जास्त लोड आल्याने फुईज बॉक्स मधील एक लाईन चा फुईज जळाल्याने गावची पाण्याची मोटर बंद पडली म्हणून .
कर्मचारी अजित राऊत यांनी गावच्या सरपंच निकिता आवाळे यांना सांगितले सरपंच आवाळे यांनी महावितन चे वायरमन पाटणे यांना फोन केला पण त्यांचा फोन बंद लागला म्हणून किकवी अभियंता साहेब यांना फोन केला तर बरेच फोन करून सुद्धा फोन उचलला नाही.
पर्यायी गावातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने दोन तासाने कर्मचारी यांनी रोहित्रावर जाऊन फुईज बॉक्स मधील फुईज टाकण्या साठी गेला असता मोठ्या प्रमाणात विजेचा करंट हाताला लागल्यामुळे हताचे कातडे जळाले असून वीज करंट लागून लांब फेकल्याणे मोठी दुर्घटना टळली
वागजवाडी गावाला आणखी एका नवीन वीजरोहित्राची गरज असून हे वीज रोहित्र एखाद्या नागरिकाचा जीव घेऊनच मिळणार का.
नवीन वीज रोहित्रची मागणी अर्ज महावितरण कार्यालयात धूळ खात पडला असून .
जर पुढील पंधरा दिवसात नवीन वीज रोहित्र बसले नाही तर वागजवाडी गावातील नागरिक पुणे सातारा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती गावच्या सरपंच निकिता आवाळे यांनी दिली.
आज झालेल्या दुर्घटनेला महावितरण चे सतत टाळाटाळ करणारे कर्मचारी व अधिकारी या घटनेला जबाबदार असल्याची चर्चा वागजवाडी गावांमध्ये आहे