महत्त्वाचे

मोरवाडी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न


 

मारवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे वैभव न्यूज नेटवर्क: मोरवाडी / भोर

भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील मोरवाडी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेला प्रथम क्रमांक. पृथ्वीराज थोपटे यांनी 25.000
द्वितीय क्रमांक महेश टापरे यांनी 15.000
रोहन बाठे यांनी 11.000
चेतन कोंढाळकर यांनी 7.000
अशी बक्षिसे देण्यात आली होती.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडी भोर तालुका अध्यक्ष व 108 गाडीवरील एमर्जेंसी मेडिकल ऑफिसर साई स्पर्श क्लिनिक चे मालक डॉ मंदार माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्व बक्षिसांची रक्कम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी खर्च करण्यात येते.
तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार जतन करून तरुण पिढीने योग्य मार्गाने आपले आयुष्य जगावे अश्या सामाजिक हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे किकवी पंचक्रोशी व भोर तालुक्यात मोरवाडी गावातील नागरिक तरुणांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक जगदंब वॉरीअर. द्वितीय क्रमांक स्वराज वॉरीअर. तृतीय क्रमांक हिंदवी वॉरीअर .व चतुर्थ क्रमांक छावा वॉरीअर यांनी पटकावला .