भोर मतदार संघात संग्राम थोपटें सुचवतील त्या रस्त्यांना कामासाठी निधी उपलब्ध होईल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
भोर मतदार संघातील मा.आ.संग्राम थोपटे सुचवतील त्या रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध होईल.!- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.शिवेंद्रसिंह भोसले यांच्या दालनात भोर राजगड मुळशीचे मा.आमदार श्री.संग्राम थोपटे यांची बैठक झाली.
यावेळी झालेल्या बैठकीत मा.आमदार संग्रामदादा थोपटे यांनी उपस्थित राहून भोर विधानसभा मतदार संघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करणे बाबत मागणी केली.
यावेळी मा.मंत्री महोदय यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली असून भोर, राजगड मुळशी तालुक्यातील येणाऱ्या रस्त्यांची CRF(केंद्रीय रस्ते) व HAM( हायब्रीड ॲन्युईटी मेन्टेनन्स) अंतर्गत कामे प्राधान्याने घेतली जातील व प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गाच्या कामांना जास्तीत जास्त निधी दिला जाईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
तसेच इतर जिल्हा मार्गांचे प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा वाढवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या हिवाळी अधिवेशनात काही रस्ते जे मा.आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या कडून सुचविले जातील ते घेतले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला मा.आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता श्री.राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग पुणे विभाग श्रीमती श्रुती नाईक, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग श्रीमती अनुराधा भंडारे, उपअभियंता पुणे श्री.राहुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता भोर श्री.राजेसाहेब आगळे, शाखा अभियंता श्री.योगेश मेटेकर, जि.परिषद उपअभियंता जि.प.बांधकाम उपविभाग भोर श्री.विकास कुलकर्णी आदीसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


