पुणे जिल्ह्यात होणार अंतराराष्ट्रीय सायकल स्पर्धा ग्रामीण भागात रस्त्यांसाठी भरपूर निधी
पुणे जिल्ह्यात होणार आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा
भोर/: पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने भोर. पुरंदर. मुळशी. हवेली. राजगड तालुक्यात रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्पर्धेत जवळजवळ 50 देशांचे सायकलपटू सहभागी होणार असून ही भारतातील प्रथमतः ऑलिम्पिक दर्जाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे.
स्पर्धेचे नियोजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.यांच्या संकल्पनेतून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघासाठी 121 कोटी, तर पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी 114 कोटी रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यांचा रुंदीकरण सात मीटरपर्यंत केला जाणार असून, त्यात दिशादर्शक फलक आणि रोजगार निर्मितीसाठी सुविधा उपलब्ध केली जाणार आहेत.
भोर . पुरंदर . राजगड. मुळशी. हवेली.तालुक्यातील ग्रामीण भागातील पर्यटन क्षेत्र, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकास यासाठी या रस्त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
स्पर्धेची स्टेज रूट्स पुढीलप्रमाणे आहेत:
स्टेज 1: पुरंदर हवेली – भोर – गोळीबार मैदान – पुरंदर मार्गे कपूरहोळ (109 किमी)
स्टेज 2: मुळशी – बापूजी मंदिर – पौड – हाडशी – काले – शिवणे – आढळे – नेरे – मारुंजी – हिजवादी भुमकर चौक (92 किमी)
स्टेज 3: पुणे हवेली – मुळशी – PCMC मधील गाव (99 किमी)
स्टेज 4: बारामती – पुरंदर मधील गाव (137 किमी)
भोर आणि पुरंदर मतदारसंघातील विशेष रस्त्यांच्या विकासामुळे ग्रामीण भागाचा दर्जा वाढेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध होईल असे.
माजी आमदर संग्राम थोपटें यांनी पत्रकर परिषदेत सांगितले.

संपादक : योगेश जाधव

