राजकीय

आता थांबायचे नाही आणि थांबणार नाही भोंगवली कमथडी गटात उमेदवारी मिळावी के डि भाऊ सोनवणे यांचा थेट इशारा


 

आता थांबायचे नाही आणि थांबणार नाही भोंगवली कमथडी गटात उमेदवारी मिळावी के डि भाऊ सोनवणे यांचा थेट इशारा

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर

अतिशय चुरशीची व प्रतिष्ठेची लढत होणार असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये भोंगवली कामथडी जिल्हा परिषद गटात ज्येष्ठ नेते के डि भाऊ सोनवणे यांनी त्यांचा मुलगा महादेव सोनवणे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार तैयारी चालू केली आहे.
गटातील प्रत्येक गावात वाड्या वस्त्या वरील मतदारांची भेट घेऊन मतदारांची मते जाणून घेतली आहेत.
मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे
आता थांबायचे नाही आणि थांबणार नाही असा थेट ईशरा के डी भाऊ सोनवणे यांनी दिला आहे.

गेली चाळीस वर्षापासून माजी मंत्री अनंतराव थोपटे व माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या सोबत निष्ठेने काम करत आलो आहे.
समाजातील सर्वसाधारण नागरिकांशी सामाजिक बांधिलकी जोपासत राजकारण नव्हे तर समाज कारण करत आहे .
आज पर्यंत भोंगवली कमथडी गटात भाजप पक्षाला उमेदवार विजयी करता आला नाही .
या गटातील बरेच मतदार कामानिमित्त व मुलांच्या शिक्षणा साठी पुणे मुंबई सारख्या शहरात वास्तव्यास असल्याने या मतदारांनपर्यंत या गटातील उमेदवार पोहचू शकला नाही.
मी अनेक निवडणुका जवळून पाहिल्या असून
जर माझ्या मुलाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली तर नक्की विजयी होऊ आणि बदल घडवू
म्हणून आता थांबायचे नाही आणि थांबणार नाही असे के डी भाऊ सोनवणे यांनी सांगितले.