लाईटीच्या जाचाला कंटाळून ग्रामीण भागातील नागरिक शहरात होणार रहिवाशी
लाईटीच्या जाचाला कंटाळून ग्रामीण भागातील नागरिक शहरात होणार रहिवाशी
पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर
- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नागरिक सतत जाणाऱ्या लाईटीच्या जाचाला कंटाळून ग्रामीण भागातून शहरी भागात राहण्यासाठी जाणार असल्याची चर्चा चालू आहे .
1960 ते 1970 च्या दशकात नव्याने ग्रामीण भागात लाईटीचे आगमन झाले तेव्हापासून 2026 पर्यंत जुन्या गंजलेल्या खांब तारांवरती तालुक्यातील ग्रामीण भागातील लाईटीचा खेळ चालू असल्यामुळे एखादी हलकी वाऱ्याची झुळूक जरी आली तरी चार चार तास लाईट जात आहे.
आजच्या जीवनामध्ये लाईट नसेल तर माणसाचे आयुष्य शून्य असून . नागरिकांच्या जीवनात प्रत्येक गोष्टीला लाईट आवश्यक आहे.
त्यामध्ये सध्या आखाती देशातील युद्धामुळे देशात गॅस तुटवडा असल्यामुळे अनेक नागरिकांनी लाईटवर चालणाऱ्या शेगड्या घेतल्यामुळे रोजचे जीवनावश्यक जेवण विद्युत शेगडीवर बनवण्याचे काम चालू आहे आणि त्यात भरमसाठ पडलेल्या उष्ण तापमान वाढत असून.
भोर तालुक्यातील ग्रामीण भागात थोडी हवा सुटली तरी देखील चार चार तास लाईट जात असून या गंभीर बाबीकडे विद्युत महावितरण कंपनीचे अभियंता शाखा अभियंता अधिकारी लाईनमन वायरमेन निष्काळजीपणाने काम करत असल्याने निकृष्ट व निष्काळजी कामामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागांमध्ये वास्तव्यासाठी जाणार असल्याची चर्चा सध्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात चालू आहे .
जुनी झालेले विद्युत खांब तारा नव्याने बसवण्यासाठी पुणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांनी सांगितले आहे.
हा लाईटचा लपंडाव जर थांबला नाही तर अभियंता शाखा अभियंता वायरमेन लाईनमन यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या प्रांगणात ग्रामीण भागातील नागरिक आंदोलन करणार असल्याची ही चर्चा चालू झालेली आहे .
महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला. आता खऱ्या अर्थाने लाईटीच्या जाचाला कंटाळून शहराकडे जाण्याची गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे असे नागरिक चर्चा करत आहेत.


