राजकीय

भोंगवली पंचायत समिती गणात राजेंद्र मोरे यांना मतदारांची पसंती


 

भोंगवली पंचायत समिती गणात राजेंद्र मोरे यांना मतदारांची पसंती

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क भोर

भोर तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
भोंगवली पंचायत समिती गणांत बलाढ्य पक्षातील इच्यूक उमेदवार तिकीट मिळावे म्हणून मतदारांची मने जिंकून घेण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत.
आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असणारा इच्यूक उमेदवार पैसे खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही.
पण खरा निष्ठावंत मतदार नागरिकांच्या मनात काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

भोंगवली पंचायत समिती गणांत वागजवाडी गावचे फौजी भारतीय जनता पार्टीचे भोर तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र बबन मोरे यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजेंद्र मोरे यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना देशासाठी फार मोलाचे काम केले आहे.
व गेली दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष पद भूषवत असताना
समाजिक क्षेत्रात काम करत असताना . भोर तालुक्यातील पूर्व भागातील प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर विकास निधी उपलब्ध केला आहे.
समाजातील प्रत्यक व्यक्तीच्या सुख दुःखात सहभाग नोंदवत असल्यामुळे राजेंद्र मोरे यांना भोंगवली पंचायत समिती गणांत मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे.