आरोग्य

राजगड किल्ल्यावर पर्यटकांच्या हुल्लड बाजी मुळे पर्यटकांना मधमाश्यांचा चावा


 

राजगड किल्ल्यावर पर्यटकांच्या हुल्लड बाजी मुळे पर्यटकांना मधमाश्यांचा चावा

पुणे वैभव : न्यूज नेटवर्क

भोर / राजगड

राजगड किल्ल्यावर येणारा युवक सिगारेट ओढून धुर काढतात . व वेगवेगळ्या अत्तर सेंट मुळे किल्यावरील मधमाशा खावळून पर्यटकांवर चावा घेण्यासाठी तुटून पडतात.

नेमक असच आज शनिवारी दुपारी 2 वाजता राजगड किल्यावर घडले .
मुंबई येथून पर्यटणासाठी आलेल्या पर्यटकानवर मध माश्यानी अचानक हल्ला चढवला व मध माश्यानी चावा घेतल्याने पर्यटकांची मोठी धांदल उडाली.
या मध मश्यांच्या हल्यात दहा ते बारा पर्यटकांना मध माशा चावल्याने गडावर व गडाच्या पायथ्याशी मोठा हाहकार उठला.

पण जन सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून आपले काम करणारे 108 गाडीवरील एमरजेन्सी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी यांना 108 चा कॉल पडला .
आणि लगेच
108 गाडीवरील एमरजेन्सी मेडिकल ऑफिसर् डॉ मंदार माळी यांनी गाडीचे पायलट विशाल कदम यांच्या सह.
राजगड किल्याच्या पायथ्याशी पोहचले .
मध माश्यानी चावा घेतलेल्या पर्यटकांना रेसकू टीम चे दीपक पिलाने व त्यांचे सहकारी यांनी झोळीत आणलेल्या पर्यटकांना वेळीच उपचार डॉ मंदार माळी यांनी सुरु केले व मोठा अनर्थ टाळला .

डॉ मंदार माळी यांनी आज पर्यटकासाठी आवाहन केले आहे की राजगड किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने
छत्रपतींचे मावळे म्हणून गडावर यावे. येताना कोणत्याही पद्धतीचे हानी कारक व्यसनी पदार्थ घेऊन येऊ नये. व उग्र अत्तर सेंट अंगावर मारून येऊ नये